आयपीएलचा दुसरा हंगाम : तिकिटविक्रीला जोरदार प्रतिसाद

April 3, 2009 11:52 AM0 commentsViews: 1

3 एप्रिल दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या आयपीएल मॅचेसच्या दुसर्‍या हंगामाची सुरूवात चांगली झाली आहे. आयपीएलची तिकिटविक्री आजपासून सुरु झाली असून क्रिकेट प्रेमींचा आपीएलला प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची तिकीटं अवघ्या 2 तासांत विकली गेली. 18 एप्रिलला न्युलॅण्ड्स आणि पटाऊनला होणार्‍या ओपनिंग मॅचेसही हाऊसफुल होणार आहेत. आयपीएल स्पर्धेचा उदघाटन सोहळा हे प्रेक्षकांच्या गर्दीमागचं मोठं कारण असल्याचंही आयपीएलचे संचालक मोदी यांनी सांगितलं. पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये रंगणार आहे तर दुसरी मॅच राजस्थान रॉयल्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर यांच्यामध्ये होणार आहे.

close