क्वीर आझादी मार्च : समलैंगिकांच्या हक्कांना जागा मिळवून देणारी चळवळ

April 3, 2009 4:08 PM0 commentsViews: 10

3 एप्रिल, मुंबईअलका धुपकरलोकसभेच्या निवडणूक जाहिरनाम्यांत समलैंगिक व्यक्तींच्या हक्कांना जागा मिळावी म्हणून आता एक चळवळ सुरू झाली आहे. भारतातल्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच अशी खुली चळवळ सुरू झाली आहे. ' हमसाया ', ' हमसफर ट्रस्ट ', ' लेस्बीयन ऍण्ड बायसेक्शुअल इन ऍक्शन ', ' रेनबो ' अशा सर्व संघटनांनी मिळून 'क्वीर आझादी मार्च' या नावाने ही मोहीम सुरू केली आहे. जगातला पहिला समलैंगिक राजकारणी हार्वी मिल्क. 1970 च्या दशकात अमेरिकेत सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये तो बोर्ड ऑफ सुपरवायझर म्हणून निवडून आला. समलैंगिक पुरुष म्हणजेच गे व्यक्तींच्या हक्कासाठी लढला आणि 1978 मध्ये त्याचा खून करण्यात आला…पण हार्वी मिल्कने सुरू केलेली गे हक्कांची लढाई जगभरात पसरत राहिली. यंदाच्या ऑस्करच्या स्पर्धेत हार्वी वरचा मिल्क सिनेमा आला आणि राजकारणातली गेंचा सहभाग पुन्हा एकदा चर्चेत आला. भारतातही 15 व्या लोकसभेच्या निवडणुकीत समलैंगिकांना हक्क देण्याची खुली तयारी पहिल्यांदाच काही राजकीय पक्षांनी दाखवली आहे. ' अंबुमणी रामदॉस यांच्या पीएमकेने आमचं समर्थन केलं आहे. वृंदा करात यांचंही आम्हाला पाठबळ मिळालं आहे. सीपीएमचंही आम्हाला समर्थन लाभलं आहे, असं वकील आदित्य बंडोपाध्याय म्हणाले. ' मोठमोठ्या पक्षांनीही समलिंगीना पक्षाचं तिकीट द्यायला हवं, असं नेपाळचे गे-खासदार सुनील पंत म्हणाले. गे-खासदार सुनील पंत यांच्या म्हणण्यानुसार तसं झालं तर गे, लेस्बीयन, तृतीयपंथी आणि बायसेक्‌श्अुल्सना निवडणुकीच्या जाहिरनाम्यांमध्ये जागा मिळणं ही कायदेशीर हक्क मिळवण्याच्या लढाईतली पहिली पायरी ठरणार आहे.

close