भिवंडी मतदारसंघातून विश्वनाथ पाटील अपक्ष म्हणून उभे

April 3, 2009 3:18 PM0 commentsViews: 8

3 एप्रिल , भिवंडी भिवंडी मतदारसंघामध्ये भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत पदार्पण केलेले विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणर असल्याची माहिती विश्वनाथ पाटील यांनी भिंवडीतल्या एका मेळाव्यात दिली आहे. भिवंडी मतदार संघ भाजपाकडे गेल्याने विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देणं अडचणीचं होऊन बसलं आहे. त्यातच विश्वनाथ पाटील हे पुन्हा भाजपात प्रवेश करण्यास नकार देत असल्यानं भाजपाला अजून या मतदार संघात उमेदवार देता आला नाही. साडेचार लाख कुणबी मतदार असलेल्या या मतदार संघात राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे.

close