अण्णा हजारेंना दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव

April 25, 2014 8:58 AM0 commentsViews: 303

mageshkar awards25 एप्रिल :  कला आणि साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा  मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात काल पार पडला. यावर्षी अण्णा हजारे, ऋषी कपूर, उस्ताद झाकीर हुसेन, शिवाजी साटम, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, प्रकाश बाल यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

यावेळी लता मंगेशकर यांचा नवा सुफी अल्बम ‘या रब्बा’चंही लाँचिंग झालं. मंगेशकर कुटुंबासोबत अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आजच्या इतका आनंद कोणत्याच पुरस्कारांच्यावेळी झाला नाही अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे आणि अभिनेता ऋषी कपूर यांनी व्यक्त केली आहे.

यंदा हे 25वं वर्ष असून मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २४ एप्रिल रोजी मा.दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येतात.

यावर्षी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी मा. दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी ख्यातनाम तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन व पंढरीनाथ कोल्हापुरे यांना मा.दीनानाथ पुरस्कार देण्यात आला आहे. तर शिवाजी साटम व ऋषी कपूर यांना चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी पुरस्कार देण्यात आला. तर उत्कृष्ट नाट्य निर्मितीबद्दलचा मोहन वाघ पुरस्कार दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे यांच्या छापा-काटा या नाटकास देण्यात आला आहे.

मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार

  • सामाजिक सेवेबद्दल जीवनगौरव पुरस्कार – अण्णा हजारे
  • प्रदीर्घ संगीत सेवा – पंढरीनाथ कोल्हापुरे, उस्ताद झाकीर हुसेन
  •  मा.दीनानाथ मंगेशकर पत्रकारीता पुरस्कार – प्रकाश बाळ, अनंत दीक्षित
  •  चित्रपटातील प्रदीर्घ सेवा – शिवाजी साटम, ऋषी कपूर
  •  साहित्य क्षेत्रातील वाग्विलासिनी पुरस्कार – डॉ.आनंद यादव
  •  सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी आनंदमयी पुरस्कार – खरे वाचन मंदिर, मिरज
  •  उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार – छापा-काटा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++