तावडेंची पवारांच्या व्यंगावर टीका

April 4, 2009 8:03 AM0 commentsViews:

4 एप्रिल, दिंडोरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी खिल्ली उडवली आहे. दिंडोरी मतदारसंघातल्या चांदवडमध्ये विनोद तावडे यांनी पवारांच्या व्यंगावर टीका केली आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर अभिरूचीहीन टीका केली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात चांदवड इथे तावडे यांची काल शुक्रवारी संध्याकाळी सभा झाली. यात तावडे यांनी शरद पवारांची नक्कलही केली. शरद पवार यांच्या तोंडाचं ऑपरेशन झालं आहे. त्या व्यंगाचा आधार घेऊन तावडे यांनी बोबडं बोल काढत पवारांची नक्कल केली. तावडे यांनी निवडणूक प्रचाराची पातळी अतिशय खाली नेल्याचं यावरून दिसतं आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या वर गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या भाजप नेत्यांनी अतिशय जहरी टीका वेळोवेळी केली. पण टीकेचा दर्जा कधी घसरला नव्हता.

close