राहुल गांधींनी भरला अमेठीमधून उमेदवारी अर्ज

April 4, 2009 8:24 AM0 commentsViews: 1

4 एप्रिलकाँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज उत्तरप्रदेशातल्या सुल्तानपूरमध्ये अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यासाठी राहुल आणि आई सोनिया गांधी सुल्तानपूरमध्ये दाखल झाल्यात. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं फुलांच्या वर्षावात जंगी स्वागत केलं. अमेठी मतदारसंघातून राहुल दुसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. 2004 मधल्या निवडणुकीपेक्षा आता पक्षाच्या जागा वाढवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न राहुल करताहेत. त्यांच्याच सल्ल्यानुसार उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये पक्षानं एकला चलो रे चा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

close