दाभोळ खाडीत एम व्ही पवीत जहाजाला आग

April 25, 2014 12:39 PM0 commentsViews: 321

paviti25  एप्रिल : जहाजांमध्ये आग लागण्याची मालिका अजूनही सुरुच आहे.  दाभोळ खाडीमध्ये उभ्या असलेल्या ‘एम व्ही पवीत’ या जहाजाला काल संध्याकाळी 7:30 वाजता आग लागली. या जहाजावरती ज्यू नावाची स्पीड बोट होती त्या स्पीड बोटीला संध्याकाळी आग लागली. आगीचे कारण अद्याप समजलेले नसून आग आटोक्यात आली आहे.

या आगीत कुणीही जखमी झालेले नाहीये . हे जहाज 3 वर्षांपूर्वी मुंबईत भरकटलं आलं होतं. मेरीटाईम बोर्डाने ते तेव्हा ताब्यात घेऊन दाभोळ खाडीत सुरक्षित ठिकाणी नांगरून ठेवलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close