राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या संदर्भातला निर्णय खंडपीठाकडे

April 25, 2014 11:24 AM0 commentsViews: 153

rajiv gandhi25 एप्रिल : माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी सात दोषी मारेकर्‍यांच्या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टाने खंडपीठाकडे सोपवला आहे. अशाप्रकारची समस्या पहिल्यांदाच आल्याने याविषयीचा निर्णय खंडपीठाने घेणं योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

तमिळनाडू सरकारने राजीव गांधी यांच्या सातही मारेकर्‍यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यानंतर संथान, मुरुगन व पेरारीवलन या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या तिघांनी शिक्षेविरोधात राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला होता. मात्र गेली अनेक वर्षे या दया अर्जावर कोणताही निर्णय न झाल्याने फाशी रद्द करून आपल्याला जन्मठेप द्यावी अशी याचिका यासाठी संथान, मुरुगन व पेरारीवलन या तिघांनी दाखल केली होती. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास ११ वर्षे विलंब झाल्यामुळे या तिन्ही दोषींची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलत असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close