असं कसं होऊ शकतं? हे योग्य नाही, ‘भूतनाथ’ची नाराजी

April 25, 2014 6:34 PM0 commentsViews: 1466

big_b_amitabh bachchan bhoothnath returns25 एप्रिल : एकीकडे मतदान करा आपला हक्क बजावा, लोकशाहीचं कर्तव्य पार पाडा असं आवाहन सगळीकडून केलं जात पण ऐन वेळी मतदार यादीतूनच नाव वगळलं गेल्यामुळे लाखो मुंबईकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय. अनेक मुंबईकर मतदान न करता मतदान केंद्रावरुन रिकाम्या हाताने घरी परतले. मुंबईकरांच्या या नाराजीबाबत ‘भूतनाथ’ अर्थात बॉलिवूडच्या शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीही चिंता व्यक्त केली.

आजच्या वर्तमानपत्रातल्या सगळ्या बातम्या या, मतदारयादीत नाव नसल्याने नाराज झालेल्या मुंबईकरांच्या आहेत. असं कसं होऊ शकतं? हे योग्य नाही अशी चिंता बच्चन यांनी व्यक्त केली. ट्विटरवर बिग बींनी आपली प्रतिक्रिया नोंदवलीय. बिग बींनी गुरुवारी सहकुटुंब जया बच्चन, अभिषेक, सून ऐश्वर्यासह मतदान केलं.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा भूतनाथ रिटर्न्स हा सिनेमा अलीकडेच रिलीज झालाय. या सिनेमात अमिताभ यांनी भूतनाथची भूमिका साकारलीय. निवडणुकीची धामधूम लक्ष्यात घेतात या सिनेमातही निवडणुकीचा विषय संवेदनशीलपणे मांडण्यात आलाय. एका भ्रष्ट नेत्याविरोधात भूतनाथ निवडणूक लढवतो आणि जिंकतोही पण विशेष म्हणजे लोकांनी मतदान करावं यासाठी आगळीवेगळी मोहिमही राबवतो. त्यामुळेच बिग बी अर्थाच भूतनाथने मतदानाला मुकलेल्या मतदारांची बाजू घेतलीय. आणि मतदान प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केलीय.

विशेष म्हणजे मुंबईत पहिल्यांदाच मतदानाची टक्केवारीही पन्नासच्यावर पोहचली. मागिल वेळी मतदानाची टक्केवारी ही फक्त 47 इतकीच होती. अशातच मतदारांना मतदान न करता आल्यामुळे मतदार तर नाराज आहेतच पण अनेक दिग्गजही या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

अमिताभ बच्चन यांचं ट्विट
“आजच्या वर्तमानपत्रातल्या सगळ्या बातम्या या, मतदारयादीत नाव नसल्याने नाराज झालेल्या मुंबईकरांच्या आहेत…असं कसं होऊ शकतं? हे योग्य नाही.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close