नागपूरमध्ये 9 दिवसांपासून मिहान प्रकल्प अंधारात

April 25, 2014 9:23 PM0 commentsViews: 390

235nagpur_mihan25 एप्रिल : नागपूरला आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणारा बहुचर्चित मिहान प्रकल्प गेल्या 9 दिवसांपासून अंधारात आहे. वीजपुरवठा कमी पडल्यानं हा अंधारात असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे तब्बल 7 हजार कर्मचार्‍यांवर संकट आलंय.

तसंच अनेक उद्योगातून होणारी निर्यात बंद आहे.मिहान सेझमधल्या उद्योगांना मनोज जयस्वाल यांच्या अभिजीत उद्योगसमूहातून वीज मिळत होती. पण अभिजीत उद्योग समुहाला कोळसा इंडोनेशियातून आयात करावा लागत होता. तसंच अभिजीत उद्योग समूह डबघाईला आल्याने मिहान सेझचा वीजपुरवठाच बंद करण्यात आलाय.

यामुळेच इथल्या उद्योजकांचं मनोधैर्य खचलंय. कायद्यानुसार इथल्या उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्याची जबाबदारी प्रकल्प विकासक एमएडीसीची आहे. पण हीच कंपनी उद्योजकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या जबाबदारीतून पळ काढत असल्याचा आरोप उद्योगाने केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close