पुण्यात साखळी चोर टोळी जेरबंद

April 25, 2014 9:31 PM0 commentsViews: 693

df46pune_crime_news25 एप्रिल : पुण्यात विविध भागात साखळ्या चोरणार्‍या इराणी आंतरराज्यीय टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचे तब्बल 150 चेन स्नॅचिंगचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

या टोळीकडून पोलिसांनी सव्वा दोन किलो सोन्याचे दागिने, एक पिस्तुल आणि 3 काडतुसं असा 80 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या टोळीतील सात आरोपींना अटक केली आहे.

सज्जाद गरीब शहा पठाण उर्फ इराणी हा या टोळीचा म्होरक्या आहे. सज्जाद पठाण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये देखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांच्या तपासात दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close