हापूस मस्त 3 मिनिटांत फस्त

April 25, 2014 9:49 PM0 commentsViews: 534

25 एप्रिल : पुण्यातल्या आंबा महोत्सवात लहान मुलींना मनसोक्त हापूस आंबे खाण्याची संधी मिळाली होती. बालगंधर्व रंग मंदिरच्या परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदा ही आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. या आंबा महोत्सवात लहान मुलींसाठी खास हापूस आंबा खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलींना 2 मिनिटांत 3 आंबे खायला देण्यात आले. तीन मिनिटांत जी मुलगी जास्त आंबे खाणार त्या मुलीला विजेता घोषित करण्यात आलं. या स्पर्धेत 11मुली सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेच्या निमितानं या मुलींनी मनसोक्त हापूस आंबे खाण्यास मिळाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close