बुलडाण्यात गावकर्‍यांनी टाकला दलितांवर बहिष्कार

April 26, 2014 3:04 PM0 commentsViews: 5147

buldhana_dalit_26 एप्रिल : बुलडाणा जिल्ह्यतल्या बेलाड गावातल्या दलितांवर गावकर्‍यांनी बहिष्कार टाकला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे हा बहिष्कार घालण्यात आला. या गावात काही दिवसांपूर्वी झेंड्यावरून वाद झाला होता.

त्याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर दलितांना अगदी दुकानातलं सामानही विकत देण्यात येत नाही. दुकानात जीवनावश्यक वस्तूही विकत दिल्या जात नाहीत. मजुरीचं कोणतंही काम दिलं जात नाही. त्यामुळे या लोकांवर उपासमारीची वेळ आलीय. विद्यार्थ्यांना क्लासला जाण्यासाठी रिक्षांमध्येही घेतलं जात नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. त्यामुळे या समाजाने मतदानावरच बहिष्कार घातला आणि न्याय मिळवण्याची धडपड सुरू आहे. याविषयी न्याय मिळावा म्हणून या समाजानं लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाार्‍यांना निवेदनही देण्यात आली पण अजूनही बहिष्कार कायम आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close