मोदी देशाला शरम वाटेल असं काम करणार नाहीत -प्रल्हाद मोदी

April 26, 2014 4:30 PM0 commentsViews: 2658

26 एप्रिल : नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याचा आम्हाला विश्वास आहे. पण मोदी पंतप्रधान झाले तर असं कोणतही काम करणार नाही ज्यामुळे देशाची मान शरमेनं खाली झुकेल. देशातील जनता, उद्योजक आणि विरोधकांना त्यांच्या कामावर संशय घेण्याची संधी सुद्धा मिळणार नाही. मोदी चांगलंच काम करून दाखवतील असा विश्वास भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यक्त केली. आयबीएन लोकमतच्या न्यूज एडिटर अलका धुपकर यांनी प्रल्हाद मोदींची खास मुलाखत घेतली. यावेळी मोदी चहावाला होते यावरूनही अनेकांनी भाष्य केलं. पण मोदींचं बालपण कसं होतं, आणि ते नेमके चहावाले कसे झाले याविषयीच्या आठवणी प्रल्हाद मोदी यांनी सांगितल्या. आमच्या आई वडिलांनी खूप हालअपेष्टा सहन करुन आम्हाला लहानाच मोठं केलं. पण आजचा हा दिवस पाहण्यासाठी आमचे वडील इथे नाही. ते जिथे कुठे असतील त्यांना नरेंद्र मोदी यांच्या यशाबद्दल नक्की आनंद असेल असं सांगताना प्रल्हाद मोदी यांना अश्रू अनावर झाले. तसंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर ही आमच्यासाठी गौरव आणि अभिमानाची गोष्ट आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि ते चांगले पंतप्रधान होतील अशी भावना प्रल्हाद मोदी यांनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close