जळगाव पोलिसांकडे सापडलं चोरीचं सागवान

April 4, 2009 11:29 AM0 commentsViews: 86

4 एप्रिल, चोपडा अजय पालीवालजळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात चोरीचं सागवान शोधण्यासाठी वनविभागाने छापे टाकलेत. त्यात चक्क 10 पोलिसांच्या घरातच चोरीचा साग सापडलाय. अडावदच्या पोलीस स्टेशन आवारांत असलेल्या पोलीस कर्मचारी वसाहतीत हे छापे टाकण्यात आले. या घरांमध्ये टाकलेल्या धाडीत सागवान लाकडाच्या तीनशे कटसाईज फळ्या आणि ब्लॉक्स जप्त केले आहेत. या घरांच्या व्हरांड्यांत आणि गच्चीवर या चोरीच्या मालाचा साठा केला होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला सातपुडा डोंगर आता बोडका होत चालला आहे. नैसर्गिक वनसंपत्तीचा साठा असलेल्या सातपुड्यात सागाची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली. चोपड्याच्याच पोलीस ठाण्यांत जप्त केलेला सागावान लाकडांचा साठा वनविभागाने ठेवला आहे. सातपुड्यांत नेहमीच होणारी वृक्षतोड आणि सागवान लाकडाची तस्करी ही पोलीसांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.पण या तस्करीत खुद्द पोलीसच सामील असल्याचं आढळलं आहे. या कारवाईमुळे तस्करांची साखळी उघडकीला येते की काय अशी आशा निर्माण झाली आहे.

close