इतरांवर मी नियंत्रण ठेवू शकत नाही-पंतप्रधान

April 26, 2014 7:56 PM0 commentsViews: 2026

Image img_228082_pmonpak_240x180.jpg26 एप्रिल : माझे भाऊ भाजपमध्ये गेल्याचं मला दु:ख आहे. पण इतरांवर मी नियंत्रण ठेवू शकत नाही अशी प्रतिक्रिया पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. डॉ. सिंग यांचे सावत्र भाऊ दलजीत सिंग कोहली यांनी शुक्रवारी अमृतसरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.यावर पंतप्रधानांनी दुख व्यक्त करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

‘देशात नरेंद्र मोदींची लाट नाही’ असं म्हणणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना नरेंद्र मोदींनी चांगलाच झटका दिला. मोदींनी थेट सिंग यांच्या गडावर हल्ला चढवत सिंग यांचे सावत्र भाऊ दलजीत सिंग कोहली यांना भाजपच्या गोटात आणलं. अमृतसरमध्ये भाजपचे नेते अरुण जेटली यांच्या प्रचारसभेसाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते यावेळी दलजीत सिंग यांनी मोदींची गळाभेट घेत प्रवेश केला.

पंतप्रधानांचे भाऊ दलजीत यांचं भाजपमध्ये स्वागत आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसला चिमट काढला. दलजीत यांच्या प्रवेशामुळे आम्हाला चांगला फायदा होईल आणि पक्ष आणखी मजबूत होईल. भाजप हा रक्तांच्या नात्यांवर विश्वास ठेवणार पक्ष आहे असंही मोदी म्हणाले. तर ज्या प्रकारची वागणूक डॉ. सिंग यांना काँग्रेसमध्ये मिळते, त्यामुळे आपण अस्वस्थ आहोत आणि म्हणून भाजपमध्ये प्रवेश करता आहोत अशी प्रतिक्रिया दलजीत सिंग यांनी दिली. विशेष म्हणजे खुद्द नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित दलजीत यांचा प्रवेश झाला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली.

मनमोहन सिंग यांनी प्रामाणिकपणे देशासाठी मोलाच कार्य केलं. गेली दहा वर्ष ते देशाची सेवा करत आहे. पण दलजीत यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला हा त्यांचा निर्णय असू शकतो पण त्यांच्या या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला अशी प्रतिक्रिया सिंग याचे नातू रणदीप सिंग यांनी दिली. या प्रकरणावर त्यांच्या ‘घरचा मुद्दा’ आहे असं म्हणत काँग्रेसचे नेते प्रतिक्रिया देण्यास पुढे आले नाही. त्यामुळे डॉ.सिंग यांनी भावाच्या कारनाम्यावर दु:ख व्यक्त केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close