काळू-बाळूंचा जीवनप्रवास

April 26, 2014 9:27 PM0 commentsViews: 928

26 एप्रिल : सुप्रसिद्ध तमाशा कलावंत अंकुश खाडे उर्फ बाळू यांचं दीर्घआजारानं निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. काळू-बाळू या जोडीनं तमाशामध्ये 70 ते 90चं दशक गाजवलं.

तमाशा सम्राट अंकुश खाडे उर्फ बाळू हे काळू-बाळूच्या जोडीतले एक कलाकार…हे दोघे जुळे भाऊ ..काळू यांचं नाव लहू असं होतं आणि 7 जुलै 2011 रोजी त्यांचं निधन झालं. जहरी प्याला, राजा हरिचंद्र, राम नाही राज्यात आणि सोंगाड्या ही त्यांची अतिशय गाजलेली वगनाट्यं..या वगनाट्यांमध्ये हे दोघंही प्रामुख्यानं सोंगाड्याची भूमिका करत..विशेष म्हणजे मराठी सिनेमातल्या सुवर्ण काळातही त्यांच्या वगनाट्याला भरगोस प्रतिसाद मिळायचा. ही जोडी अनेक यात्रा आणि जत्रांमध्ये खास आकर्षण ठरायची..फक्त राज्यातच नाही, पण मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही या नाटकांचे प्रयोग झाले. त्यांना मिळणारी प्रसिद्ध त्यांच्या सामाजिक जाणिवेच्या मध्ये कधी आली नाही. त्यांनी अनेक संस्थांसाठी विनामूल्य प्रयोग केले. काळू-बाळूंचं अडनाव खाडे असलं तरी कवलापूरकर म्हणून ते प्रसिद्ध होते. गंमत म्हणजे हे दोघं इतके सारखे दिसायचे की,प्रयोगांमध्ये काळू कोण आणि बाळू कोण हे ओळखण्यासाठी पैज लावली जायची. त्यांचं वागणं-बोलणंही अगदी सारखं होतं.तमाशाचा इतिहास हा काळू-बाळूंवर अनेक पानं लिहिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या दोघांनाही IBN लोकमतची आदरांजली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close