ऑलिम्पिकवीर कुस्तीपटूवर जनावरांचं शेण काढण्याची वेळ !

April 26, 2014 10:01 PM0 commentsViews: 2446

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून दिला. पण याचं जिल्ह्यातला एक ऑलिम्पिकवीर कुस्ती मल्ल आजही उपेक्षीत राहिलाय.

बंडा पाटील-रेठरेकर..वय 63 वर्ष..कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये रेठरे गावात राहतात. या बंडा पाटलांनी अनेक कुस्त्या गाजवल्या. 1965 साली जपान ऑलिम्पिकमध्येही त्यांनी भारताचं नाव राखलं. पण आज परिस्थिती काही वेगळी आहे. त्यांना आज जनावरांचं शेण काढण्यापासून इतर काम करावी लागत आहेत. बंडा पाटलांनी 7 वेळा महाराष्ट्र केसरी पुरस्कार पटकावलाय. पण त्यांना अजूनही शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला नाही.

बंडा पाटलांना राज्य सरकारने मुंबईत एक फ्लॅटही देऊ केला पण गेली 10 वर्षं या फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये फेर्‍या माराव्या लागत आहेत.

क्रिकेटसारख्या खेळावर सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा उधळले जातात. पण बंडा पाटलांसारख्या मैदान गाजवलेल्या पैलवानाकडं लक्ष द्यायला मात्र आपल्या सरकारला वेळ नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close