मोदी आमच्यावर कधीही हल्ला करू शकतात, दंगलग्रस्तांना भीती !

April 26, 2014 10:54 PM8 commentsViews: 6679

26 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी देशाची सत्ता हातात घेण्याची स्वप्न पाहत आहेत पण त्यांच्या राज्यात जिथे 2002 ची दंगल झाली त्या नरोडा पाटियामध्ये हजारो निष्पाप लोकांना आपला जीव गमावावा लागला. त्या दंगलग्रस्तांच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. “नरेंद्र मोदींचं मन साफ नाही, आजही ते आमच्यावर हल्ला करू शकता, त्यांच्यावर आम्हाला विश्वास नाही, आम्हाला पाकिस्तानला हाकलून लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, उद्या जरी मोदी पंतप्रधान झाले तर आमच्या मनात भीती कायम आहे. देशातील मुस्लिमांच्या विरोधात शीतयुद्ध पुकारले जाईल” अशी खदखद नरोडा पाटियातील दंगलग्रस्तांनी पहिल्यांदाच आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मांडली. नरोडा पाटियातील दंगलग्रस्तांची खदखद आणि भीती ही त्यांच्याच जुबानी…

“आम्ही दंगलग्रस्त असून सुद्धा माझ्या पतीला कुणी नोकरी देत नाही. मोदी म्हणतात, विकास केला पण आमच्या पोटात एकावेळंच अन्न मिळत नाही मग हा कसला विकास ? आम्हालाच जेवण मिळत नाही तर आमची मुलं कशी पोट भरणार ? आमच्या मुलांनाही शाळेत प्रवेश दिला जात नाही. दंगलीनंतर सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. फक्त आम्हाला 1,200 रुपये दिले. आमचं घरदार सगळं जळालं पण मोदींनी काहीच दिलं नाही. उद्या जरी मोदी पंतप्रधान झाले तर आमच्या मनात भीती कायम आहे. आताच ही लोकं दंगल करण्याची धमकी देत आहे. आमच्या इकडच्या स्थानिक वृत्तपत्रातून मुस्लिमांना मारा, त्यांना पाकिस्तानामध्ये पळवून लावा अशी धमकी दिली जात आहे. पण आम्ही भारतीय आहोत भारतात जन्म घेतला. मग आम्ही पाकिस्तानात का जायचं ? जगायचं तर भारतातच आणि मरायचंही भारतातच. आमची पिढी इथं मेली आम्हीही इथेच मरणार.” असा संताप येथील दंगलग्रस्त व्यक्त करत आहे.

“मोदींना क्लीन चीट जरी दिली असली तरी ते दोषीच आहे. त्यांचं मन साफ नाही ते कधीही काहीही करू शकतात. आमच्यावर कधीही हल्ला करू शकतात, त्यांच्यावर आम्हाला विश्वास नाही. ही गोष्ट आम्ही मेलो तरी विसरू शकत नाही. आज पण जाफरी हत्याकांडाचा खटला कोर्टात सुरू आहे. पण इथं न्यायाधीशांनाच दिवसभर कोर्टात बसवलं. मग त्यानंतर बडोद्यातील न्यायाधीश आले आणि त्यांनी खटला स्थगित केला. मग इथले न्यायाधीश निर्णय देऊ शकत नाही का ? ”

“2002 ची दंगल ही पूर्वनियोजित होती. सर्व काही ठरवून सुरू होतं. मोदींचा या प्रकरणात सहभाग नव्हता असं म्हटलं जात आहे पण एखाद्या राज्याचा राजा (मुख्यमंत्री) आणि त्याला याबद्दल माहितीच नसले तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. गोंध्रा हत्याकांड झालं त्यानंतर दुसर्‍या
दिवशी इथे दंगल पेटली होती. पण त्यानंतरही मोदींनी दंगलग्रस्तांची भेट घेतली नाही. जर भेट घेतली असती तर आम्हाला दिलासा तरी मिळाला असता की, ‘आमचा मुख्यमंत्री हा सेक्युलर आहे, त्यामुळे मुस्लिमांच्या दुखात सहभागी झाला’ असं तरी आम्हाला वाटलं असतं पण तसं झालंच नाही. मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांच्या हातात पूर्ण सत्ता येईल. आणि देशात जिथे जिथे मुस्लिम राहत असतील तिथे युद्ध तर नाही पण शीतयुद्ध नक्की होईल. अशा भागातील मुस्लिमांचा विकास होणार नाही. आमच्या मुलांना नोकर्‍या दिल्या जाणार नाही.”

“मोदी देशाला कधीच सांभाळू शकणार नाही. महात्मा गांधींची ही भूमी आहे त्यामुळे आम्ही आजपर्यंत इथं आहोत. भारतात राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. भाजप आणि संघाची भूमिका अत्यंत चुकीची आहे. मुस्लिमांना मारा आणि पळवून लावा असंच या लोकांना वाटतं हे चुकीचं आहे.”

“गोंध्रामध्ये हत्याकांड झालं पण आमच्या वस्तीत त्याचे पडसाद उमटले. त्या दंगलीत माझ्या मुलाला मारलं. माझ्या डोळ्या देखत जाळलं हे मी कधीच विसरू शकत नाही. मी मरेपर्यंत हे विसरू शकत नाही. हे सर्व मोदींमुळेच झालं. मोदींना आमची हाय लागेल. मोदी आमच्यासाठी काहीच करणार नाही ते आमची माफी मागूच शकत नाही.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Vilas Khole

  माझा एक प्रश्न आहे …. ह्या पीडितांना हे कोणी सांगितलं कि दंगल मोदी ने घडवून आणली? कोणी ह्यांच्या गळी उतरवलय? ह्यांना मोदिनी मारलं कि अजून कोणी? कुठल्या आधारावर हे म्हणत आहेत कि नरेंद्र मोदी दोषी आहेत?

 • Parag Wadkar

  Jar hi dangal namo ni ghadavun aanli , ma karsevakana koni jalala soniyane, ki rahul gandhi ne, karan khangree muslmanana full support karta na

 • raju

  Real face of Modi…..

  WOW! What a development!

 • rajendra

  modi is criminal plz dont support modi..
  and only modi is responsible for gujrat riot and all terrorism in india..
  modi hates muslim.and other cast excpt hindu…
  if u really want developmnt den vote any other menber excpt bjp and rss supported members who is think for india not for hindu..

 • Basu Kotagi

  today every where modi modi…..shout all channels,this is not paid news….?aapki news aaegi to o sach,aur apake khilap news aahi to o paid agent..wow sahi ja rahin ho………..No body will accept riots are good……….buut gujarat main khuch hu hi nahi ….? khud ke maan se pucho e sawal .jawab mil jayaega…………

 • Naru.dev

  One has to accept he has demonstrated against Cong independently..!! we wish India should also glorify under his leadership….He will take his critics as well along with him…!! welcome all critics for betterment of India..but such news will create fog of communal…We are not asking anybody to praise him but criticism beyond the result of court is condemn of court…

 • sharad_kul

  Ibn-lokmat tv channel modichy virodhi ahe he sagalyana mahiti ahe tyani hi kahani tayar karun modi vifrruddha tayr keleli ahe atta paryant deshat kiti thikani dangali zaly ahet kashmirmadhye roj ateriki lokana goly marun thar maratat tithale lok ummar viruddha kahich kase bolat nahi tasech muzafar madhye dangali zaly tyavirodhi tithaly lokani vichar ka mandale nahi ajun paryant 1984 chy dangali madhye ajun tari konalacha shiksha zalali nahi shikh lokanchi mulakhati dakhvaliy nahit tathakathi patra pandit khote nidharmi lokcha gadalele bhut sarakhe sarakhe ukrun kadhat ahe

 • Dave Makkar

  MERELY CHANGING OF THE RULING DISPENSION FROM CONGRESS TO BJP WILL NOT CHANGE THINGS IN INDIA: The development model of Gujarat has largely benefited the already rich industrialists. The pertinent question here is: Should ‘development’ be limited only to a few powerful Business houses?? Shouldn’t it be inclusive?? Are large industrial projects that uproot the common man from their farmlands, forest and natural environs, the only way to take the nation forward? The answer is a stern NO!! All across the nation businesses are robbing the country of its natural wealth. There is lack of transparency and massive corruption in allocation of natural resources as unearthed by media and constitutional bodies like the CAG . Merely changing of the ruling dispensation from Congress to the BJP will not change things. When corporate make thousands of crores and build billion dollar skyscrapers to live, while the common man struggles to get drinking water, health care, toilets, schools, shelter – it does not bode well for the country.

  For 1100 acres of land in Sanad in 2008 Tata Motors paid Rs 900/sqm to the Gujarat Government. The government acquired the land at Rs 1,200 per square meter.
  Tata Motors only invested Rs 2000 crores and got a government loan of Rs 9,570 crore for 20 years at 0.1 per cent rate of interest. This loan was 23% of Gujarat ’s budget for 2008. On top of other subsidizes;100 acres of land at a highly subsidized rate near Ahmedabad for Tata township.
  Modi has lured away Nano plant using huge amount of money directly from Gujarat government’s coffers. What has the state gained till now, Nano has failed, so have “cascading effects of the plant” Tata Motors’ Sanand plant stays idle (April 2013 plant utilization was mere 4.5%).
  The attraction for corrupt Industrial Houses and MNC ’s is not Modi but Free Money.
  Practically same story is for Ford, Suzuki, ADANI, Ambani etc. on top of this they all received various Incentives in other words poor Tax Payers are paying to the rich multi billion corporations.
  Total Subsidies to TATA Rs 30,000 Crore, Suzuki 20,000 Crore & Ford 20,000 Crore
  Under Modi Rule Adani GP revenue from $765 Million in 2002 rose to $8.8 Billion in March 2013 while net profits climbed even faster.
  Income Tax Incentives
  10 year corporate tax holiday on export profit – 100% for initial 5 years and
  50% Corporate Tax Holiday for the next 5 years
  Exemption from dividend distribution tax
  Indirect Tax Incentives
  Zero customs duty
  Zero excise duty
  Exemption from central sales tax
  Exemption from service tax
  During the same time 60,000 small scale industries shut down
  Over 5,500 farmers in the last 10 years have committed suicide in the state but police have been instructed by Modi govt not to register cases.
  CAG reports from 2001-2012/13 show corruption to the tune of Rs 1.5 lakh crore. The state took nine years to appoint a Lok Ayukta.”
  Gujarat’s budget increased from Rs 28,000 crore in 2001 to Rs 1,20,000 crore in 2013-14, public debt during the same period increased from Rs 26,000 crore to Rs 1,76,000 crore.”
  This is the last chance for Indian voters to take responsibility of India the country they love and cherish. The Indian voters to save India must dump Congress & BJP in the nearest gutter in this Lok Sabha elections in 2014. India do not need failed Pro Rich Zionist/Jewish Economic as well inhuman Zionist/Jewish Foreign Policies of Jewnited States of America where the top 1% owns 43% of the US assets, 9% owns 40%, 10% owns 10% and bottom 80% owns princely 7% US assets. I HAVE A VERY SIMPLE QUESTION TO EVERY INDIAN LEADER, IF THE ZIONIST (PRO RICH) ECONOMIC POLICIES HAVE BECOME A CURSE FOR AMERICA ; HOW IT CAN BECOME A BLESSING FOR POOR INDIANS?

close