फेरमतदानाला चांगला प्रतिसाद

April 27, 2014 8:12 PM0 commentsViews: 1315

2Image img_190962_vote_240x180.jpg7 एप्रिल :राज्यात आज चार मतदानकेंद्रांवर फेरमतदान झालं. अहमदनगरमधल्या श्रीगोंदातल्या हिरडगाव मतदान केंद्रावर सर्वाधिक 64% मतदान झालं. तर मुंबईतल्या कांदिवीलीमध्ये 58%, मालवणी मध्ये 35% तर चांदिवलीमध्ये 56% मतदान झालं.

मागच्या गुरूवारी महाराष्ट्रात झालेल्या मतदानात मतदार याद्यांमधला घोळ समोर असतानाच आता निवडणूक कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणा मुळे नवा घोळ समोर आला आहे. म्हणूण आज महाराष्ट्रात चार ठिकाणी फेरमतदान घेण्यात येत आलं  होत.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 305 वर आज फेरमतदान घेण्यात आलं तर मुंबईमध्ये चारकोप, चांदीवली आणि मालाड (पश्चिम) मधल्या प्रत्येकी एक अशा तीन मतदान केंद्रावर आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात आलं.

प्रशिक्षणादरम्यानचा डेटा इव्हिएममधून डिलीट न काढल्याने मुंबई आणि नगरमध्ये फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाआधी हा आधीचा डेटा काढणे गरजेचं असतं. मात्र निवडणूक कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मतदान सुरु होण्या आधीही हा डेटा इव्हिएममध्येच होता. त्यामुळे झालेल्या मतदानापेक्षा मतदानाचा टक्का वाढल्याचं लक्षात आलं, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close