भाजप नगरसेविका अर्चना कोठवदे यांचं अपहरण

April 27, 2014 1:51 PM0 commentsViews: 966

archana kotawade 27 एप्रिल : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदेयांचं अपहरण करण्यात आलं आहे. विरोधकांनीच त्यांचे अपहरण केल्याचा आरोप भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे.

भाजपच्या स्थायी समिती सदस्या अर्चना कोठावदे या शुक्रवार रात्रीपासूनच घरी आलेल्या नाहीत. येत्या 29 एप्रिल रोजी स्थायी समीती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या अपहरणामागे विरोधकांचा हात असल्याचा आरोपही रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. सभापती पदासाठीच्या लढतीत चुरस निर्माण झाली आहे. अर्चना कोठावदे यांच्या जिवाला धोका असून विरोधकांनी त्यांचे अपहरण केले असावे असा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेविका अर्चना कोठावदे या स्थायी समिती सदस्य असून या निवडणुकीत अर्चना कोठावदे यांची महत्वाची भूमिका असल्याने त्यांचे अपहरण केले असावे असा आरोप त्यांनी केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close