मोदींकडून कुठलीही विशेष सवलत मिळाली नाही – अदानी

April 27, 2014 1:42 PM0 commentsViews: 965

dropouts_gautam_adani_600x45027 एप्रिल : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही विशेष सवलत मिळालेली नाही. आमचा समूह 1993 पासून पडीक जमिनी घेऊन विकासाचे प्रकल्प राबवित आहे, असे स्पष्टीकरण अदानी ग्रुप्सचे प्रमुख गौतम अदानी यांनी दिले आहे. त्याचं बरोबर कच्छ भागात कोणीही जात नसलेल्या ठिकाणची पडीक आणि शेतीसाठी अनुकुल नसलेली जमीन आम्ही घेतली, असंही ते म्हणाले

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अदानी यांना कवडीमोल भावाने मोदींनी गुजरातमधील जमिनी दिल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वीभूमीवर अखेर अदानी ग्रुपने मौन सोडून त्यावर अदानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जमीन खरेदीबाबत स्पष्टीकरण देताना अदानी म्हणाले, की मुंद्रा येथे 1993 मध्ये जमीन खरेदी करताना गुजरातचे चिमनभाई पटेल हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी दहा पैसे प्रती स्केअर मीटर असा भाव लावण्यात आला होता. त्यानंतर 1995 मध्ये केशुभाई पटेल मुख्यमंत्री असताना एक रुपया प्रती स्केअर मीटर, 1997 मध्ये शंकरसिंह वाघेला मुख्यमंत्री असताना दीड रुपये प्रति स्केअर मीटर दराने आणि आता मोदी सरकारच्या काळात पाच हजार एकर जमीन 15 रुपये प्रती स्केअर मीटर दराने खरेदी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close