वरूण यांच्या कोठडीत एका आठवड्याची वाढ

April 4, 2009 11:55 AM0 commentsViews: 5

4 एप्रिल, एटाप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वरूण गांधी यांच्या कोठडीत एका आठवड्याची वाढ करण्यात आली आहे. भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांनी मायावती सरकारकडून वरूणला मिळणा-या वागणुकीचा निषेध केलाय. वरूणवर अन्याय झाल्याच मत व्यंकय्या यांनी व्यक्त केलंय.त्यामुळे आता सोमवारी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि वरूण गांधी यांच्या एटा जेलमध्ये होणा-या भेटीवर सा-यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये पक्षाचे सरचिटणीस अरूण जेटली यांच्या उपस्थित आज भाजपनं एका बैठकीचं आयोजन केलय. त्यात वरूण यांच्या प्रकरणावर पक्षाची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.

close