मोदी समर्थकांनी समुद्रात बुडून जीव द्यावा – फारुख अब्दुल्ला

April 27, 2014 5:47 PM1 commentViews: 2387

farooq abdullah27 एप्रिल :  नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी समुद्रात बुडून जीव द्यावा असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. श्रीनगरजवळील एका प्रचारसभेत मोदींवर टीका करताना अब्दुल्लांची जीभ घसरल्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

‘मोदींना मत न देणार्‍यांना पाकिस्तानमध्ये जावे लागले असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले. यावर टीका करताना अब्दुल्ला म्हणाले, मोदींना मत देणारे समुद्रात बुडायला पाहिजे. मोदी सत्तेत आल्यास जम्मू – काश्मीर भारतापासून वेगळे होईल असा पुनरुच्चारही त्यांनी केला. फारुख अब्दुल्लांच्या या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीत नेत्यांची बेताल वक्तव्यांची मालिका सुरुच असल्याचे दिसून आले.

दरम्यान, फारूख अब्दुल्लायांच्या सभेजवळ दोन ग्रेनेड स्फोट झालेत.  या हल्ल्यातून फारुख अब्दुल्ला सुरक्षित बचावले असले तरी या हल्ल्यात 10 जण जखमी झाले आहेत. यावर ‘मी अशा कृत्यांना भीत नाही’ अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ratan marathe

    modi ji ko hara nahi sakta isliy kuch bhi bink mat kutte

close