स्थायी समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र वायकरच

April 4, 2009 12:20 PM0 commentsViews:

4 एप्रिल, मुंबई मुंबई महानगरपालिकेचे मुख्य आर्थिक केंद्र असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र वायकर यांची निवड झाली आहे. वायकर यांची सलग चौथ्यांदा या पदावर निवड झाली आहे. आजच देवकर यांचा कार्यकाल संपत होता. याबाबत मातोश्रीवर बैठक झाली. त्यात वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, यासंदर्भात मातोश्रीवर बैठक सुरू होती. सभागृह नेते सुनील प्रभू आणि काही वरिष्ठ नगरसेवक यांच्यात ही चर्चा सुरू होती. शिवसनेचे मंगेश सातमकर यांचं नाव अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आघाडीवर होती. याशिवाय, नगरसेविका श्रद्धा जाधव आणि राहुल शेवाळे यांचीही नावं होती.

close