मोबाइल नंबर लवकरच अकरा आकड्यांचा

April 4, 2009 12:25 PM0 commentsViews: 1

4 एप्रिलपुढच्यावर्षी तुमचा मोबाइल नंबर बदलण्याची शक्यता आहे. कारण मोबाइल नंबर आता अकरा आकड्यांचा होणार आहे. दूरसंचार विभागानं 2010 पासून मोबाईल नंबर अकरा आकड्यांचा करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. आता अकरा आकड्यांचा मोबाइल नंबर वापरायला तयार व्हा. कारण दूरसंचार विभागानं तसा प्रस्ताव ठेवलाय. सध्याच्या दहा आकड्यांचा मोबाइल नंबर फक्त यावर्षी ऑगस्ट महिन्यांपर्यंतच वापरता येईल. त्यानंतर जानेवारी 2010 पासून मोबाईल नंबर्स अकरा आकड्यांचे करण्यात येणार आहेत. मागच्यावर्षी मोबाईल धारकांच्या संख्येत 49 टक्क्यांची वाढ झाली होती. चालू आर्थिक वर्षात अंदाजे 347 अब्ज लोकांकडे मोबाइल आहे. फक्त जानेवारी महिन्यांत 10 कोटी 81 लाख लोकांनी मोबाइल्स खरेदी केले. त्यात फेब्रुवारी महिन्यात 13 कोटी 45 लाख लोकांची वाढ झाली. भारतात मोबाइल फक्त फोन करण्यासाठीच वापरत नाहीत. त्याशिवाय गेम्स सर्फिंगसाठीही मोबाइलवापरला जातो. 28 टक्के लोकं वेबसर्फिंगसाठी वापरतात. प्रत्येक शंभर लोकांसाठी देशात छत्तीस मोबाइल कनेक्शन्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय मोबाइल कंपन्यांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळं कॉलरेट्सही कमी केले जातात. सध्या प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांचं लक्ष ग्रामीण भागाकडे लागलंय. नेटवर्क 18 ला मिळालेल्या माहितीनुसार दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी मोबाइल नंबर 11 आकड्यांचा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यासंदर्भातली अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

close