100जागांचा पल्ला गाठणही काँग्रेससाठी कठीण आहे – नरेंद्र मोदी

April 27, 2014 7:39 PM0 commentsViews: 1494

27-Modi-IndiaInk-blog48027 एप्रिल : यंदाची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. देशात काँग्रेसविरोधी लाट असल्याने लोकसभेत काँग्रेसला 100जागांचा पल्ला गाठण्यासाठीही कॉंग्रेसला कसरत करावी लागणार आहे असे भाकीत नरेंद्र मोदींनी वर्तवले आहे.  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी आज रविवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखातीत प्रियांका गांधी तिच्या आईचा आणि भावाचा बचाव करत असल्या तरी मला त्यात काहीच अडचण नाही असंही मोदींनी स्पष्टक केलं आहे.

त्याच बरोबर गुजरातमध्ये मोदींनी उद्योजकांना फायदा पोहोचवल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला. मी कुठल्याही उद्योजकांना नियम डावलून फायदा करुन दिला नाहीये. उलट काँग्रेसला ठोस मुद्द्यांवर माझा विरोध करता येत नाहीये म्हणून मी हुकूमशाही प्रवृत्तीचा, देश तोडणार्‍या वृत्तीचा आहे असा अपप्रचार करत आहेत असा टोला मोदींनी लगावला.

देशात काँग्रेसविरोधी मजबूत लाट आहे आणि देशातली जनता भाजपच्या बाजूने आगे. माझ्याकडे लोकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आहेत असा दावा मी कधीच केला नाही असं उत्तर मोदींनी सोनिया गांधींच्या आरोपांवर दिलं आहे.

तर रॉबर्ट वडेरा यांच्याविषयी बोलताना ,’मी सूडाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. मात्र कायद्‌यानुसार कारवाई व्हायला हवी,’ अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे. सत्तेवर आल्यास देशाच्या आजारी अर्थव्यवस्थेला पुन्हा सक्षम करण्यास प्राधान्य देऊ असे आश्वासन मोदींनी दिले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close