भाजपचा वडरांवर आरोप

April 27, 2014 8:01 PM0 commentsViews: 836

27 एप्रिल :  सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडरा यांच्या जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या गाजत आहे. भाजपने आज पत्रकार परिषद घेऊन रॉबर्ट वडरा यांचा एक व्हिडियो दाखवला आणि त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला. हा ‘दामादगेट घोटाळा’ असल्याचा आरोप भाजपनं केलाय. वडरा यांनी हरियाणा आणि राजस्थानात जमीन घोटाळ्याचा केल्याचं भाजपचं म्हणणं आहे. वडरा यांनी नियम डावलून जमिनी लाटल्या पण, काँग्रेस त्यांचा बचाव करत असल्याचंही भाजपनं म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close