राहुल गांधींकडे कोट्यवधींची मालमत्ता आली कुठून?- अण्णा हजारे

April 28, 2014 11:55 AM0 commentsViews: 2575

28 एप्रिल : राहुल गांधी अजूनही सत्तेच्या नशेत असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. राहुल गांधींच्या हाती काँग्रेसची धुरा आल्यानंतर सर्व स्तरांवरून उलट-सुलट प्रतिक्रिया येत असल्या तरी अण्णा हजारे मात्र यावर काही बोलले नव्हते. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाचं ते राहुल गांधींविषयी बोलले आहेत.

राहुल गांधी स्वच्छ प्रतिमेचे आहेत का असा प्रश्न विचारला असताना ते म्हणाले, राहुल गांधी अजूनही सत्तेच्या नशेतच आहेत. ते स्वच्छ प्रतिमेचे आहेत याचं प्रमाणप्रत्र मी कसं देऊ. त्यांची प्रतिमा जर स्वच्छ असेल तर प्रतिज्ञापत्रात लिहिलेली कोट्यवधींची मालमत्ता आली कुठून असा असा सवाल अण्णांनी विचारला.

नरेंद्र मोदींचं सरकार आल्यास रिमोट कंट्रोल कोणाकडे असेल असा प्रश्न विचारला असताना अण्णांनी मोदींबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिली. मोदींची विकास करण्याची इच्छा दिसत असली, तरी त्यांचा रिमोट कंट्रोल उद्योगपतींच्या हातात असेल, असं अण्णा म्हणाले.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या धुरळ्यापासून अण्णा हजारे दूर आहेत. पण आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीतून त्यांनी सर्व घडामोडींवर सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. पाण्यावरून मतदारांना धमकी देणार्‍या अजित पवारांना तुरुंगात टाकायला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close