तालिबान भारतीय सीमेवर : जम्मू काश्मीर पोलिसांचा नेत्यांना सुरक्षेचा इशारा

April 4, 2009 12:56 PM0 commentsViews: 9

4 एप्रिलतालिबान भारतीय सीमेवर येऊन ठेपलंय अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक कुलदीप खोडा यांनी आज दिली आहे. तालिबान्यांचा पाकिस्तानात प्रभाव वाढल्यानंतर भारतात अतिरेक्यांची घुसखोरी वाढलीय. अतिरेक्यांची ही घुसखोरी पाहता त्यांना निवडणुकीत गडबड करायचीय हे उघड आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी नेत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. निवडणुकांच्या पाश्‍र्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी नेत्यांना सुरक्षेचा इशारा देऊन दहशतवादापासून जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

close