लखनौपाठोपाठ आता अमेठी, हिमाचलमध्येही बाबा रामदेवांवर बंदी

April 28, 2014 12:16 PM0 commentsViews: 347

Image img_183102_babaramdev_240x180.jpg28 एप्रिल : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे बाबा रामदेवांवर यांच्या सभांवर 16 मे पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय काल लखनौ प्रशासनाने घेतल्यानंतर आता हिमाचल प्रदेश, अमेठीमध्येही त्यांच्या सभांवर बंदी घालण्यात आली आहे.

बाबा रामदेवांवर यांनी नुकतेच राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘राहुल गांधी दलितांच्या घरी हनीमून आणि सहलीसाठी जातात,’ ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभर खळबळ उडाल्यानंतर ‘आपण दलितांचा अपमान केलेला नाही पण याबद्दल कुणाला वाईट वाटलं असेल तर आपण माफी मागतो, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. विरोधक याचं राजकारण केलं असल्याचा आरोपही बाबा रामदेवांनी केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात दोन ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

बाबा रामदेवांच्या 1 आणि 2 मे ला अमेठीतल्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. तर हिमाचल प्रदेशातही बाबा रामदेवांच्या प्रचाराला निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. हिमाचलमधल्या कांग्रा, चंबा आणि नुरपूरमध्ये रामदेव बाबा कार्यक्रम घोणार होते. त्यावर आयोगानं बंदी घातली आहे.

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close