ई टीव्हीवर नवा रिऍलिटी शो : गौरव महाराष्ट्राचा

April 4, 2009 1:47 PM0 commentsViews: 35

4 एप्रिल, मुंबई माधुरी निकुंभसध्या चॅनल सर्फिंग करताना कुठल्याही चॅनलवर रिमोट येऊन थांबला की आपल्याला पहायला मिळतो तो एखादा रिऍलिटी शो. प्रत्येक चॅनल नव्या कॉन्सेप्टचा शो लाँच करतो. तसाच ' गौरव महाराष्ट्राचा ' हा रिऍलिटी शो ई टीव्ही मराठीवर सुरू होत आहे. ई टीव्हीच्या गौरव महाराष्ट्राचा शोसाठीची ऑडिशन अंतिम टप्प्यात आलीय. नेहा राजपाल , स्वप्नील बांदोडकर, अभिजीत पोहनकर हे तिघे या स्पर्धेचे परीक्षक आहेत.महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या एकुण 16 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. आता या शोमधली रिऍलीटी लवकरच आपल्याला पाहता येईल.

close