इजिप्तमध्ये 683 जणांना फाशीची शिक्षा

April 28, 2014 4:07 PM0 commentsViews: 5455

Egypt court sentences 683 people to death28 एप्रिल : इजिप्तमध्ये कोर्टाने मुस्लीम ब्रदरहूडचे प्रमुख मोहम्मद बदी आणि त्यांच्या 683 समर्थकांना फाशीची शिक्षा ठोठावलीय. गेल्यावर्षी इजिप्तमध्ये झालेल्या आंदोलनात या सगळ्यांवर पोलिसांचा खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली शिक्षा सुनावली.

इजिप्तमध्ये सलग 30 वर्ष होन्सी मुबारक यांनी सत्ता गाजवली. त्यांची राजवट 2011 जनतेनं आंदोलन करुन उलथून लावली. त्यानंतर 2012 मध्ये इजिप्तमध्ये लोकशाही पद्धतीने पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीनंतर मुस्लिम ब्रदरहूचे मोहम्मद मोर्सीं अध्यक्षपदी विराजमान झाले.

मात्र, मोर्सीं यांच्या सत्तेला नाकारत आंदोलन पुन्हा पेटले. त्यानंतर मोसीर्ंना पायउतार व्हावं लागलं. यावेळी झालेल्या हिंसक आंदोलनात हजारो लोकांना बळी गेला. 14 ऑगस्ट 2012 रोजी मोसीर्ंचे समर्थक आणि मुस्लीम ब्रदरहूडच्या सदस्यांनी आंदोलन केलं. यावेळी एका पोलीस स्टेशनवर हल्ला करून पोलिसांची हत्या केली होती. या प्रकरणी कोर्टाने आज 683 जणांना फाशीची शिक्षा सुनावली.

683 पैकींनी 50 जण पोलिसांच्या ताब्यात आहे तर काही जण जामिनावर बाहेर असून तर काही जण फरार आहेत. कोर्टाने 683 जणांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टाच्या परिसरात दोषींच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close