‘दिव्याखाली अंधार’, मोदींच्या बंगल्यामागेच गावाची दैना

April 28, 2014 11:28 PM1 commentViews: 4250

28 एप्रिल : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सरकारी बंगला गांधीनगरमध्ये आहे. या बंगल्याच्या मागे 1 किलोमीटरच्या परिसरात बोरीज गाव आहे. या गावात आमची टीम पोचली तेव्हा मोदी दावा करत असलेल्या विकासाच्या अगदी उलट चित्र बघायला मिळालं. ‘दिव्याखाली अंधार’ अशीच काहीशी परिस्थीती पाहण्यास मिळाली. गावात रस्ते, पाणी, वीज सर्वच मूलभूत सोयींची वानवा आहे. मोदींनी फक्त शहरांचा विकास केला पण आम्ही त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागेच राहतो पण त्यांनी कधीच आमच्याकडे लक्ष्य दिलं नाही. प्रत्येकवेळा फक्त मतं मागण्यासाठी ही लोकं येतात पण आमच्या अडचणींवर उपाय कुणी काढत नाही. त्यामुळे फक्त शिव्या देण्यावाचून आमच्याकडे काही नाही असा संताप इथले गावकरी व्यक्त करताय. या गावाचा आढावा घेतलाय आमच्या न्यूज एडिटर अलका धूपकर यांनी…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Harshal Deodhe

    dats gr8 work ……..

close