वाराणसीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केला ‘आप’च्या कार्यकर्त्यांवर हल्ला

April 29, 2014 11:47 AM0 commentsViews: 602

aap fight29 एप्रिल :  उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमध्ये 12 मे रोजी म्हणजे शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. इथल्या लढतीनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल इथून रिंगणात उतरले आहेत. ही लढत फक्त राजकीय न उरता अक्षरशः त्याला मारामारीचं स्वरूप आलं आहे.

वाराणसीमध्ये काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या दरम्यान आपच्या कार्यकर्ते आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली, यात आपचे काही कार्यकर्ते जखमी झाले.

याबाबत पोलिसांनी FIR दाखल केलाय. गेल्या काही दिवसांतला आपवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close