न्यूयॉर्क हल्ल्यामागे तालिबानी नाहीत – एफबीआयचं स्पष्टीकरण

April 4, 2009 2:55 PM0 commentsViews:

4 एप्रिल, न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारापाठीमागं पाकिस्तानातल्या तालिबानी नेत्यांचा हात नव्हता, असा निर्वाळा अमेरिकन गुप्तचर एजन्सी एफबीआयनं दिला आहे. तालिबानी नेता बैतुल्ला मेहसुदचा या हल्लामागं हात होता, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यानुसार, त्यात तालिबान्यांचा हात नसल्याचं एफबीआयनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

close