मोदींनी बालिश टीका करू नये-प्रियांका गांधी

April 29, 2014 11:32 PM0 commentsViews: 823

12priyanka_gandhi_29 एप्रिल : राहुल गांधी शहजादा म्हणून हिणवणार्‍या मोदींचा प्रियांका गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधानपदाच्या उमेदवारानं अशा बालिश टीका करू नये अशी खरमरीत टीका प्रियांका गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदी यांच्यावर केली.

देशात उद्या सातव्या टप्प्याचं मतदान होतंय आणि सोनिया गांधींसह अनेक दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होतंय. सोनिया गांधी यांनी यावेळी रायबरेलीमध्ये फक्त दोन सभा घेतल्या आहेत. रायबरेलीची संपूर्ण धुरा यावेळी सांभाळली ती प्रियांका गांधी यांनी…जाहीर सभा, चौक सभा, लोकांमध्ये थेट जावून मिसळणं, त्यांच्याशी संवाद साधत..प्रियंकाने रायबरेलीचा परिसर पिंजून काढला.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांधी घराणं, प्रियंका आणि त्यांचे पती रॉबर्ट वढरा यांच्यावर थेट आरोप केला. त्यामुळे नेहमी शांत आणि संयमी असणार्‍या प्रियंका गांधी यांनी आक्रमकपणे मोदींना प्रत्युत्तर दिलं. विरोधक जेवढी टीका करतात त्यानं विचलीत न होता.

त्याला धैर्यानं सामोरे जाण्याचं इंदिरा गांधी यांनी आम्हाला शिकवलं असं सांगत त्यांनी लोकांना भावनीक सादही या प्रचारात घातली. आज (मंगळवारी) अमेठीत घेतलेल्या प्रचार सभेत त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींच्या कामाचं कौतुक केलं. तर राहुल गांधींचा ‘शहजादा’ उल्लेख करणार्‍या नरेंद्र मोदींवर प्रियांकांनी तोफ डागली. पंतप्रधानपदाच्या उमेदवारानं अशा बालिश टीका करू नये असं सांगत आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close