लोकसभा हातून गेली, विधानसभेच्या कामाला लागा -पवार

April 29, 2014 11:43 PM3 commentsViews: 13696

sharad pawar4429 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचा फैसला आणखी दूर आहेत पण ‘लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या हातून गेली’ अस भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

 

लोकसभेच्या निकालांची चिंता न करता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशही पवारांनी नेत्यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसची आज (मंगळवारी) बैठक पार पडली. याबैठकीत लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या हातातून गेली, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. राज्यात तीन टप्प्यात मतदान पार पडलं.

 

यावेळी मतदानाची टक्केवारी सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आपल्यालाच सर्वाधिक 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शरद पवारांनी सर्व शिलेदारांची आज बैठक घेतली. लोकसभेच्या निकालाची चिंता न करता आता विधानसभेच्या तयारीला लागा, असं शरद पवारांनी आपल्या नेत्यांना सांगितलंय. राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mahavir Jain

    Aab nahi chalegi Congress aur Rashatwadi congress aab maharastra main chalega sirf ZADU. Aam Adami Zindabad

  • rajeradhe

    urnar fakta bhagwa…………

  • namuchi

    राष्ट्रवादी ची बैठक झाली – हि बातमी इतर हि वाहिन्यांनी दिली आहे…त्या बैठीकीत काय झाले हे हि बातमीत म्हटले आहे पण तीत शरद पवार “लोकसभा हातातून गेली” असे म्हणाले ह्याचा उल्लेख नाही..जर ते खरेच असे म्हणाले असतील तर ते इतर वाहिन्यांनी म्हटले असते पण तसे काही नाही…ह्या बाबतीत ibn lokmat तर खोटे बोलत नाही ना?

close