मोदींकडून आचारसंहितेचा भंग- काँग्रेस

April 30, 2014 10:31 AM0 commentsViews: 3079

Narendra modi with lotus30 एप्रिल : गुजरातमध्ये आज मतदान होतं असून नरेंद्र मोदींनी एका मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे. अहमदाबादमध्ये मोदींनी आज सकाळी नऊच्या दरम्यान मतदान केलं.

मतदान करताना त्यांच्या कोटवर असलेलं ‘कमळा’चं चिन्ह त्यांना काढण्यास सांगितलं होतं पण बाहेर येताना त्यांनी कमळ हातात धरलं होतं. यादरम्यान, कमळाच्या चिन्हासोबत त्यांनी आपल्या मोबाईलने सेल्फी फोटोसुद्धा घेतला. एवढंच नाही तर पत्रकार परिषदेतही ते कमळ हातात घेऊनच बोलत होते. कमळ हे भाजपचं निवडणूक चिन्ह असल्याने याविरोधात काँग्रेस आता मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली आहे.

मोदींनी अप्रत्यक्ष प्रचार केला असा काँग्रेसचा आरोप आहे तर आम आदमी पक्षानंही मोदींवर सडकून टीका केली आहे. भाजपचा जाहीरनामा मतदानाच्या दिवशी जाहीर केला. सहाव्या टप्प्याचं मतदान सुरू असताना मोदींनी वाराणसीत अर्जही मतदानाच्या दिवशी भरला आणि आता मतदानाच्या दिवशी हातात कमळ घेऊन पत्रकार परिषद घेतली, यावर आयोग काय कारवाई करणार असा सवाल ‘आप’चे उमेदवार आशुतोष यांनी केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close