‘भाईसाब लाईन में आना’ तरुणाने आणले चिरंजीवींना ‘लाईन’वर !

April 30, 2014 10:12 AM0 commentsViews: 7808

30 एप्रिल : ‘भाईसाब लाईन में आना’ हे वाक्य सर्वसामान्यांसाठी नवं नाही पण एखादा फिल्मस्टार ज्याची झलक पाहण्यासाठी तासांतास ताटकाळत उभं राहणं, त्याच्या सिनेमाची तिकीट मिळवण्यासाठी धडपड करणं असं असताना त्या स्टारसोबत ‘भाईसाब लाईन में आना’ असं घडलं तर..हो हे घडलं आहे लोकप्रिय तेलुगू अभिनेता आणि काँग्रेसचे नेते चिरंजीवी यांच्यासोबत. त्याचं झालं असं की, चिरंजीवी आज (बुधवारी) सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. पण मतदान केंद्रावर जेव्हा चिरंजीवी गेले, तेव्हा त्यांनी रांग तोडून आधी मतदान करण्याचा प्रयत्न केला. पण एका तरुणाने चिरंजीवी यांना हटकलं आणि रांगेत उभे राहा आणि मतदान करा असं बजावलं. चिरंजीवी यांनी आपली चूक मान्य करत सर्वांसमक्ष त्या तरुणाची माफी मागितली आणि रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close