तिवारींनी मागितली गडकरींची माफी

April 30, 2014 2:47 PM0 commentsViews: 3694

tiwar_and_gadkari30 एप्रिल : काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. आदर्श सोसायटी प्रकरणी नितीन गडकरी यांनी मनीष तिवारी यांच्याविरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केला होता.

या प्रकरणी मनिष तिवारींनी नमतं घेत गडकरींची माफी मागितली असून मॅजिस्ट्रेट कोर्टात माफीनामा सादर केलाय. गडकरी यांच्या ड्रायव्हरचा वादग्रस्त आदर्श सोसायटीत फ्लॅट असल्याचं वक्तव्य तिवारींनी केलं होतं. मात्र गडकरींनी तिवारींचे आरोप फेटाळून लावले.

तसंच गडकरींनी डिसेंबर 2010 मध्ये तिवारींच्या विरोधात अब्रनुकसानीचा दावा दाखल केला होता. तिवारींनी कोर्टात हजर व्हावं म्हणून कोर्टाने तिवारींना वॉरंट बजावलं होतं. तिवारींनी 7 एप्रिलला कोर्टात हजर झाले होते. कोर्टाने 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिवारींना जामीन दिला. पण या प्रकरणावर आता तिवारींनी माफी मागत प्रकरणावर पडदा टाकलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close