‘कमळ’ भोवलं, नरेंद्र मोदींविरोधात दोन FIR दाखल

April 30, 2014 7:11 PM2 commentsViews: 2209

fir_narendra_modi 30 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मतदानानंतर आपल्याच पक्षाचं चिन्ह कमळ दाखवल्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहे.बडोद्यात मतदानानंतर हातात कमळाचं चिन्ह घेऊन मोदींनी पत्रकार परिषदेत घेतली. याप्रकरणी निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना दणका दिलाय. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मोदींविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गुजरातमधल्या संबंधित अधिकार्‍यांना मोदींविरोधात कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 (1ब) नुसार कारवाईचे आदेश देण्यात आले. या कलमानुसार आचारसंहितेच्या काळात कोणत्याही उमेदवाराला निवडणूक चिन्ह दाखवण्यावर बंदी आहे.

पण मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोबतच ही दृश्यं दाखवणार्‍या चॅनल्स आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरही कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र भाजपने मोदींची पाठराखण केलीय. मोदींकडून आचारसंहितेचा भंग झाला नाही, असा बचाव भाजपनेचे सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. तर मोदींची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणीही काँग्रेसनी केली आहे. आम आदमी पार्टीही मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.

हे पण वाचा (संबंधित बातम्या)


 » मोदींकडून आचारसंहितेचा भंग- काँग्रेस

» मोदींविरोधात एफआयआर दाखल करा, आयोगाचे आदेश

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Guest

    If Sharad Pawar Wears Watch in Hand During Election So y Not Narendra Modi………..

  • Myamit

    I don’t think matured politician would do this kind of childish act for any reason. EC should punish such candidates as per law or if possible disqualify them who consider themselves above rules and laws.

close