भुजबळांना कोर्टाचा दणका, ‘अंकित कंन्स्ट्रक्शन्स’चं काम बंद !

April 30, 2014 7:50 PM0 commentsViews: 1711

BHUJBAL ON MUNDE330 एप्रिल : सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना नागपूरच्या खंडपीठाने दणका दिलाय. भुजबळ यांचे निकटवर्तीय किशोर कन्हेरे यांच्या अंकित कंन्स्ट्रक्शन्सला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश हाटकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.

119 कोटी रुपयांच्या पीडब्लूडी घोटाळ्याप्रकरणाच्या याचिकेवर कोर्टाने हे आदेश दिले आहे. कोर्टाने छगन भुजबळ यांच्यासह सहा अधिकार्‍यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापुढे अंकित कंन्स्ट्रक्शन्सला कुठलंही काम देवू नका असंही हायकोर्टाच्या खंडपीठाने बजावलंय.

2007 ते 2010 या काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे सरकारी बंगले, आमदार निवास, रवीभवन, विधानभवनच्या दुरुस्तीचे काम अंकित कंस्ट्रक्शन्सला देण्यात आलं होतं. पण काम न करताच किशोर कन्हेरेंच्या अंकित कंन्स्ट्रक्शन्सला पैसे मिळाल्याच चौकशीत सिद्ध झालंय. किशोर कन्हेरे हे छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे विदर्भ अध्यक्ष आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close