कणकवलीत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा

April 30, 2014 8:07 PM0 commentsViews: 2998

46kankavali_rane30 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडल्यानंतर सिंधुदुर्गात आता राजकीय ताणतणावाला सुरूवात झालीय. कणकवलीत उद्योगमंत्री नारायण राणे यांचे समर्थक आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

 

संदेश सावंत यांच्यावर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या कारवाईच्या विरोधात राणे समर्थकांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सावंत याच्यावरील 307 कलम काढून टाकण्यासाठी दबाव आणला. त्याचवेळी पोलीस स्टेशन परिसरात शिवसेना कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं जमा झाले आणि 307 कलम काढू नये अशी मागणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली.

 

त्यामुळे कणकवलीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेत शिवसेना कार्यकर्ते निनाद सावंत याला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. या प्रकरणात निनादसह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांची ही कारवाई आकसाची असून आपण राणेंचे कार्यकर्ते आहोत हे काही दिवसांत एसपीला दाखवून देऊ असा इशाराही राणे समर्थकांनी दिलाय. तर शिवसेनेला जास्त मतदान झाल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी म्हटलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close