26/11 खटल्याची सुनावणी 15 एप्रिलला

April 6, 2009 8:27 AM0 commentsViews: 1

6 एप्रिल, मुंबई26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यातला आरोपी अजमल कसाबची सुनावणी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारनं दिलेला वकील घेण्यासाठी पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप फहीम अन्सारीनं आज केला. या खटल्यात कसाबसह, फहीम अन्सारीही आरोपी आहे. खाजगी वकील खटल्यासाठी मागितल्यास आपल्या परिवाराला त्रास देण्याची पोलिसांनी धमकी दिल्याचाही आरोप फहीमनं केला.

close