‘नो उल्लू बनाविंग’आतापर्यंत 272 कोटी रुपये जप्त

April 30, 2014 9:01 PM0 commentsViews: 547

76voting_money30 एप्रिल : 16 व्या लोकसभेसाठी देशभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे पण लोकशाहीच्या या उत्सवात मतदाराजाला फूस लावण्याचे प्रकार यंदाही घडले. आतापर्यंत सात टप्प्यात मतदान पार पडलंय. तर आणखी दोन टप्प्यात मतदान बाकी आहे.

पण आतापर्यंतच्या निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर पैसे आणि दारू जप्त केली आहेत. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून तब्बल 272 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. तर मतदारांना बाटलीच आमिष देण्याचे प्रकारही सर्रास घडले.

देशभरात एकूण 2.12 कोटी लीटर दारू जप्त करण्यात आलीय. तर 9 राज्यातून 166 कोटी रोख जप्त करण्यात आली आहेत. पंजाबमधून तर 145 किलो हेरॉइन जप्त करण्यात आलंय. ज्याची किंमत 725 कोटींच्या घरात आहे. आणि आंध्र प्रदेशातून 127.52 कोटी रोख ताब्यात घेण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close