हापूस घ्याच, सरकार घालणार युरोपियन युनियनला साकडं

April 30, 2014 10:08 PM0 commentsViews: 573

ge_europ_hapus_3430 एप्रिल : भारतातून जाणार्‍या हापूस आंब्यावर युरोपियन युनियनची बंदी उठवण्याची विनंती करण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ ब्रसेल्सला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

युरोपने आंब्यासह चार भाज्यांवर 1 मे पासून बंदी घातली आहे. यामुळे 25 हजार टन आंबा युरोपियन युनियनला जातो तो आता भारतातच राहणार असल्यामुळे व्यापारी चिंतेत आहे. पण चिंता करण्याचं कारण नाही यावर लवकरच तोडगा काढला जाईल असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसंच जगात इतरत्र कुठेही बंदी नाही पण अमेरिकेच्या निर्यातीसाठी आंब्यावर विकिरण प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी एक मशीन नाशिकमध्ये आहे. तर दुसरं मशीन नवी मुंबईत तातडीनं बसवणार, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, हापूस आंबा आणि चार भाज्यांवर युरोपियन देशानी घातलेल्या बंदीचे तीव्र पडसाद कृषी क्षेत्रात उमटत असून आंबा उत्पादकांना 500 कोटी रुपये तर भाजीपाला उत्पादकांना 500 कोटी असा एकूण 1000 कोटींचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे असा अंदाज शेतीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसंच फळमाशीचा प्रादुर्भाव ही अपेडा आणि कृषी खात्याची जबाबदारी असल्याचं बुधाजीराव मुळीक यांचं म्हणणं आहे. निवडणुकांच्या गदारोलात शेतकर्‍यांना आता ही भरपाई मिळणार का असा सवालही मुळीक यांनी उपस्थित केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close