चेन्नईमध्ये रेल्वेत दोन साखळी स्फोट 1 ठार

May 1, 2014 3:03 PM0 commentsViews: 1500

chennai_balast01 मे : लोकसभा निवडणुकीसाठी काहीही किरकोळ घटना वगळता शांततेतं मतदान पार पडलं. पण आज (गुरुवारी) सकाळी चेन्नई स्फोटाने हादरली. इथं बंगळुरू-गुवाहाटी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये सकाळी 7 च्या सुमारास कमी तीव्रतेचे दोन स्फोट झाले. या स्फोटांत एका तरुणीचा मृत्यू झालाय. तर 14 जण जखमी झाले आहे.

या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी चेन्नई स्टेशनमधूनच ताब्यात घेतलं होतं. तर दुसर्‍याला चेन्नई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलंय. स्फोट झालेले 2 डबे वगळता बाकी ट्रेन रवाना झाली. या स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता एनआयएने नाकारलेली नाही.

सकाळी बंगळुरू -गुवाहाटी एक्स्प्रेसच्या एस 4 आणि एस 5 या डब्यात हे स्फोट झाले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी या प्रकरणाच्या सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. या स्फोटांत स्वाती नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. मृत स्वातीही टीसीएस कंपनीची कर्मचारी आहे. पंतप्रधानांसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी या स्फोटांचा निषेध केला आहे.

दरम्यान, चेन्नई इथल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सावधगिरी बाळगण्यासाठी हाय अलर्ट बजावण्यात आला आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून कडक सुरक्षा तपासणी सुरू आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close