काळा दिवस

May 1, 2014 6:06 PM0 commentsViews: 450

01 मे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवादी संघटनांनी स्वतंत्र राज्याची चळवळ पुन्हा सुरु करण्याचा निर्धार केला आहे. काही संघटनांनी आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. विदर्भ कनेक्ट ‘व्ही कॅन’ च्या वतीने विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आलाय. नागपूरमध्येही बजाजनगरात विदर्भाच्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. आज दिवसभर मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढून विदर्भाची मागणी केली. दरम्यान, महाराष्ट्र दिनाच्या कस्तूरचंद पार्क इथल्या शासकीय कार्यक्रमात विदर्भवादी नेत्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close