‘निकालानंतर निर्णय’

May 1, 2014 6:11 PM0 commentsViews: 540

01 मे : या निवडणुकीच्या आधीच डाव्या पक्षांच्या पुढाकाराने तिसर्‍या आघाडीची स्थापना करण्यात आली होती. सध्या या आघाडीवर सामसूम दिसतेय. आघाडीत 11 पक्ष आहेत. निकालानंतर ते एकत्र राहतील का असा प्रश्नही विचारला जातोय. नेतृत्वाच्या मुद्द्यावरूनच ही आघाडी विखरून जाईल असा अंदाज बांधला जातोय. मात्र, ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्यांच्याकडे आघाडीचं नेतृत्व जाईल असं तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी स्पष्ट केलंय. सीएनएन आयबीएनचे पॉलिटिकल एडिटर भूपेन चौबे यांनी त्यांच्याशी बातचीत केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close